✍🏼लोकसंवाद /- मालवण.

बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ काळसे धामापूर आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या वतीने पूर्ण प्राथमिक शाळा काळसे धामापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ३६ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली. तत्पूर्वी धामापूर सरपंच सौ. मानसी परब आणि काळसे सरपंच सौ. विशाखा काळसेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी काळसे ग्रामपंचायत उपसरपंच अनिल सरमळकर सदस्य खुशी राऊळ, माजी सभापती राजेंद्र परब, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अमोल परब , उद्योजक महेश परब, जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या डॉ. पद्मश्री हळदणकर, डॉ. प्रांजल परब, शिक्षक महेश कदम, हर्षद नाईक, सिद्धेश काळसेकर, मधुसुदन साळसकर, धामापूर ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गावडे, प्रशांत परब, प्रविण परब, आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर धामापूर सरपंच सौ. मानसी परब यांनी सर्वप्रथम रक्तदान करून रक्तदान शिबीराचा उत्स्फूर्तपणे शुभारंभ करून दिला. यावेळी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देउन गौरवण्यात आले सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी बाल सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page