लोकसंवाद /- सावंतवाडी.
कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या कायदेशिषयक जनजागृती व्हॅनचा शुभारंभ दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. आर. बेडगकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस्. ए. उपाध्ये, विधीज्ञ पी. डी. देसाई, अध्यक्ष वकिल संघटना, सावंतवाडी व अन्य मान्यवर व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
गावागावातून लोकअदालतीचे आयोजन व्हावे यांसाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत दि. १० ते १३ फेब्रुवारी या कालावधीत मोबाईल व्हॅनव्दारे जनजागृतीसाठी करण्यात येणार आहे. यावेळी दिवाणी न्यायाधीश सावंतवाडी आर आर बेडगकर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालयाच्या आवारातून ही व्हॅन अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, सावंतवाडी तथा दिवाणी न्यायाधीश सावंतवाडी, यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केली.
यावेळी मा. दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेडगकर, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. ए. उपाध्ये, विधीज्ञ पी. डी. देसाई, अध्यक्ष वकिल संघटना, सावंतवाडी, विधीज्ञ पूजा जाधव, विधीज्ञ निलिमा गावडे, विधीज्ञ स्वप्नील कोलगांवकर सहा अधिक्षक, श्रीमती. एन. एस. सावंत व एस्. एस्. सबनीस तालुका विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ लिपीक श्रीमती व्ही एम मीर आटी न्यायालयीन कर्मचारी व पोलीस उपस्थित होते.
