✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
बेकायदेशीर वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांकडून दोन डंपरवर कारवाई करत दोघावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी गुरुवारी पहाटे तीन वाजता मळगाव ब्रीज येथे केली.दिपक कुमार सिंग (30) रा. देवली मालवण, व संदीप नारायण चिंदरकर (35) कसाल कुडाळ अशी डंपर चालकांची नावे आहेत. दोन्ही चालक आपल्या ताब्यातील डंपरमधून वाळू वाहतूक करत होते. मळगाव ब्रीज येथे पोलिस पेट्रोलिंग करत असतांना पोलिस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी हे डंपर थांबविले असता त्यांच्याकडे वाळूचे पास आढळून आले नाही म्हणून दोन्ही चालकावर शासनाचा महसूल बुडवून व वाळू करत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली तर दोन्ही डंपर येथील पोलिसात हजर केले.
