✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायची 9 फेब्रुवारीला ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळीच्या विषयात मणेरवाडी , रोहीलेवाडी येथे 22 जानेवारी पासुन नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा खंडित का ? अशी विचारणा.पण पाना पाणापुरप जाणा महिलांनी केली त्यावर सरपंच, उपसरपंच यांनी पंप जळाला असल्याने सबंधित खात्यावर दुरुस्तीसाठी पैसे नाहीत, असे सांगितले.त्यावर महिलांनी आक्रमक भुमिका घेतल्याने ही सभा वादळी ठरली.

अखेर सरपंच सिद्धि दहिबांवकर यांनी येत्या 5 दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच खोट्या प्रसिध्दी साठी विरोधकांची स्टंटबाजी केल्याचा आरोप उपसरपंच विलास हडकर यांनी केला आहे.

आयनल ग्रामपंचायत येथे सरपंच सिध्दी दहिबांवकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेला उपसरपंच विलास हडकर, चेअरमन चिंदरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र साटम, माजी सरपंच बापू फाटक, भाई साटम, उत्तम ओटवकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

या ग्रामसभेत नुतन सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला तसेच विविध विकास कामांवर चर्चा झाली. यादरम्यान पाणी पुरवठा 22 जानेवारी पासून होत नसल्याबाबत होत नसल्याबाबत मुद्दा महिलांनी मांडला. त्यावर सरपंच उपसरपंचांनी समाधान कारक उत्तर न दिल्यामुळे महिला आक्रमक झाल्या महिलांनी या कारभाराबाबत रिकामी पाण्याची भांडी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आणून निषेध केल्याची माहिती माजी सरपंच बापू फाटक यांनी देत ग्रामपंचायतच्या सत्ताधा-यांना नागरिकांना पाणी पुरवठा करता येत नसल्याचा आरोप केला. पूर्वीच्या काळात माझ्या कारकीर्दीत पाणी बिलांवर आम्ही नळयोजना चालवली होती. त्या काळात संपूर्ण कामगार वेतन आणि लाईट बिल थकीत पूर्ण रक्कम आम्ही भरत होतो. आताच तुम्हाला ही नळयोजना परवडत नाही, असा सवाल माजी सरपंच बापू फाटक यांनी केला आहे. तसेच जर नळयोजनेबाबत अडचणी असल्या तर आम्ही मार्ग काढला असता, गावातील नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे. ही आमची भुमिका आहे. महिलांनी जे आंदोलन केले ते योग्यच आहे असेही श्री. फाटक म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page