✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेची गरज ओळखून प्रशाळेला ६० हजार रुपये किमतीची साऊंड सिस्टिम भेट दिली.यावेळी विद्या विकास मंडळ इन्सुलीचे अध्यक्ष उमेश पेडणेकर, सचिव विकास केरकर, माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, मुख्याध्यापिका सौ. सुविधा केरकर, आपा आमडोसकर, आनंद राणे, सहाय्यक शिक्षक माजी विद्यार्थी गुरुनाथ पेडणेकर, संदेश पालव यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. संस्थेने शाळेचे नूतनीकरण करून नविन सुसज्ज इमारत बांधली आहे. शाळेतील वर्गखोल्यांसाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी १९८५, १९८६, १९९२, १९९४ व १९९५ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या सर्व वर्गखोल्यांना फरशी व रंगरंगोटी करून दिली आहे. माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या भौतिक गरजासाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद गावकर यांनी केले. सूत्रसंचलन सौ. अंजली सावंत यांनी तर तर आभार संजय शेवाळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page