✍🏼लोकसंवाद /- ओरोस.

ओरोस खर्येवाडी येथील सिध्दीप्रिया बिल्डिंगच्या शेजारी सामान ठेवण्यासाठी केलेल्या गाळ्यातील १२५ लोखंडी सेंट्रीग प्लेट चोरीच्या आरोपातून सर्व आरोपींची मे. मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. ए.एम फडतरे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीं तर्फे ॲड विवेक मांडकुलकर तसेच ॲड प्रणाली मोरे, ॲड भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले.

दिनांक ०७/०७/२०२२ रोजी सायंकाळी ०४:०० ते दिनांक ०९/०७/२०२२ चे दरम्यान सिद्धीप्रिया बिल्डिंगचे शेजारी साहित्य ठेवण्याच्या गाळ्याचे कुलूप तोडून १२५ लोखंडी सेंट्रिंग प्लेट चोरीला गेल्याची फिर्याद सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे देण्यात आली होती. याकामी भा. दं. वि कलम ३८०,४५४,४५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करताना संशयित आरोपी राजन आनंद सडवेलकर रा.नेरूर जकात , साईराम मंगेश म्हाडदळकर रा. पिंगुळी करमळगाळू यांना अनुक्रमे दिनांक२३/०७/२०२२ व २५/०७/२०२२ रोजी अटक करण्यात आली होती. सदर केसचे कामी सरकार पक्षाकडून एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती तसेच आरोपीं तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मे.मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. ए.एम फडतरे यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page