आज सातही आरोपींची मुदत संपत असल्याने करण्यात येणार न्यायालयात हजर..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या पैकी साई अणावकरसह त्याच्या सोबत आलेले अनोळखी ४ ते ५ जण अजुनही फरारीचं असल्याचे समजत आहे.कुडाळ पोलीसांनी अटक केलेल्या ७ आरोपींना आज बुधवारी पुन्हा पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने आज त्यांना कुडाळ न्यायालयात त्यांना करण्यात येणार आहे.कुडाळ पोलीसांनी शनिवारी आंब्रड तलाठी नवीन राठोड यांच्या तक्रारीवरून आरोपी अक्षय वालावलकर,गौरव ठाकूर, अमोल ठाकूर, अंकीत नाईक, स्नेहांकित बांदेकर,वैभव देसाई व जागृत परब या ७ जणांना अटक केली आहे.तर हे सातही जण सध्या पोलीस कोठडीत आहेत.यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज बुधवारी संपत असल्याने या सर्वाना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान शुक्रवारी रात्री ११ च्या दरम्यान कुडाळ नाबरवाडी स्मशानभूमी जवळ कुडाळचे नायब तहसीलदारासह आंब्रड तलाठयाला अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर व्यावसायिकांकडून मारहाण करण्यात आली होती.आंब्रड तलाठी नवीन राठोड यांच्या तक्रारीनुसार मारहाण करणारे एकूण १३ जण असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.यामध्ये वरील ७ जणांना अटक करण्यात आली आहे.तर ५ ते ६ जण फरारी आहेत.साई अणावकरसह त्याच्या सोबत आलेले अनोळखी ४ ते ५ जण अजुनही फरारी असल्याने त्यांचा शोध सुरू असल्याचे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.चिंदरकर व तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.