सिंधुदुर्ग/-
कन्याकुमारी जिल्ह्यातील तिरुवत्तार येथे, काल 5 फेब्रुवारी रोजी भव्य हनुमान मंदिर तसेच, मेडिटेशन सेंटर चा दिमाखदार भूमिपूजन सोहळा पार पडला. श्री. अंजनेया स्वामी ट्रस्ट, तिरुवत्तार मार्फत बांधल्या जात असलेल्या या भव्य प्रकल्पचे भूमिपूजन गोवा राज्याचे राज्यपाल महामहीम श्री. P S श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते पार पडला, तर ध्यानमंडपाच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय पर्यटन मंत्री तथा गोव्याचे खासदार श्री. श्रीपाद नाईक साहेब यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमावेळी ट्रस्ट चे श्री.अंजनेया सिद्धार् स्वामी (सत्यमामुनी), संस्थापक सौ. ब्रिन्दा श्रीकुमार, डॉ. श्रीकुमार तसेच या ट्रस्ट चे मेंबर तथा परफेक्ट अकॅडेमी चे संचालक प्रा. राजाराम परब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी गोदान, आणि 3000 हून अधिक व्यक्तींना अन्नदान आणि वस्त्रदान करण्यात आले.
प्रा. राजाराम परब यांनी शैक्षणिक क्षेत्रासोबतच अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेले योगदान फार महत्वाचे असल्याचे प्रतिपादन सर्व मान्यवरांनी केले. श्री अंजनेया ट्रस्ट चे अनेक आध्यात्मिक कार्यक्रम परब यांच्यामुळे सिंधुदुर्ग आणि गोवा येथे झाले आहेत.