लोकसंवाद /- कणकवली.

ढालकाठी मित्रमंडळाचा ढालकाठी प्रीमिअर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य असून या स्पर्धेतील खेळाडू भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना दिसतील,असा विश्वास कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेने नेते संदेश पारकर यांनी व्यक्त केला.ढालकाठी मित्रमंडळातर्फे येथील विद्यामंदिराच्या पटांगणावर आयपीएलच्या धर्तीवर ढालकाठी प्रीमिअर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री.संदेश पारकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक तथा नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेक रुपेश नार्वेकर कन्हैया पारकर, संदीप कदम, प्रसाद अंधारी, अॅड सुदीप कांबळे, काशिनाथ कसालकर, मोहन तळगावकर संदीप कदम, आदित्य सापळे, सोहम वाळके, प्रताप वाळके, मयूर खुटाळे उपस्थित होते.

शहराचा नावलौकिक वाढावा म्हणून ढालकाठी मित्रमंडळाचे कार्यकर्ते झटत आहेत. हे मित्रमंडळ आपली सामाजिक बांधलिकी जपत आहे.मंडळातील काही सदस्यांचे आकाली निधन झाले असून त्यांच्या स्मृती जपण्याचे काम हे मंडळ करीत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. ढालकाठी मित्रमंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवत असते,त्यांच्या उपक्रमांना शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो, असे श्री. पारकर यांनी सांगितले.

ढालकाठी मित्रमंडळातील सदस्य हे आपला धंदा, व्यावसाय, नोकरी संभाळून हे सामाजिक कार्य करीत आहेत. शहरातील आदर्श मित्रमंडळ म्हणून ढालकाठी मित्रमंडळाचे नाव आहे. या मंडळाला शहराच्या विकासाबद्दल आस्था असून विकासाच्याबाबत हे मंडळ आपला खारीचा वाटा उचलत आहे, असे त्यांनी सांगून त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेडूळांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page