त्या गतिरोधकांची दैनावस्था.;गतिरोधक ठरतायत अपघातास निमंत्रण.!शहरातील पार्किंग बाबतचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत.!

लोकसंवाद /- कणकवली.

कणकवली शहरात मागील काही वर्षे हायवे चौपदरीकरण चे काम सुरु आहे.असे असताना जवळपास काही ठिकाणचे काम पूर्ण झाले तर काही ठिकाणचे काम जैसे थेच राहिले आहे. मात्र अपघातांचे सत्र कायम सुरू राहील आहे. कणकवली शहरातील वाहतुकीच्या बाबतीत पाहायला गेलं तर वागदे उभादेव नजीकचा रस्ता अद्यापही मोठं मोठी आश्वासन देऊन तसाच आहे. तर सर्व्हिस रस्त्यावर वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी रबरी गतिरोधक बसविण्यात आले होते. मात्र त्या गतिरोधकांची दैनावस्था पाहता ते गतिरोधक नेमके कशासाठी? असा सवाल कणकवली शहरात वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमधून तसेच पादचारी नागरिकांमधूम उपस्थित केला जात आहे. सर्व्हिस रस्त्यावर बसवलेल्या त्या गतिरोधकाची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे अलीकडेच काही दिवसांपूर्वी कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक अपघात देखील झाला होता. हायवे ठेकेदार आणी प्राधिकरणाचा हा निष्काळजीपणा वारंवार शहरात वाहनचालकांना सहन करावा लागला आहे. हायवे संदर्भात वेगवेगळे प्रश्न नेहेमीच मीडियाच्या माध्यमातून निदर्शनास आणले जातात. मात्र प्रशासन आणी यंत्रणा जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत आहे.

वाहनचालकांना कणकवली शहरात तसेही अधिकृत वाहन पार्किंग सुविधे बाबतचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. त्यामुळे वाहनचालकांना काही खरेदी – विक्रीसाठी जायचे असेल तर त्यांना वाहन ओव्हरब्रिज खाली किंवा सर्व्हिस रस्त्यालगत पार्क कराव्या लागतात. त्यामुळे कणकवली बस स्थानक ते गांगो मंदिर पर्यंत चा सर्व्हिस रस्त्याची एक लेन ही पूर्णपणे पार्किंगसाठी वापरली जात आहे. याकडे प्राधिकरण तसेच जनतेचे रक्षक बनलेले राजकीय लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय ? असा प्रश्न देखील सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तसेच कणकवली शहरात वाहन पार्किंगकरिता एका ठिकाणी सुसज्ज अस पार्किंग देखील होणं गरजेचं आहे. तरच कणकवली शहरात होणार मोठी वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल. याकडे प्रशासन आणि यंत्रणा लक्ष देऊन याबाबत नियोजन करतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page