झालंच पाहिजे.! झालंच पाहिजे.! च्या जोरदार घोषणा ; आंदोलनकर्त्यांनी दिल्या घोषणा.!
लोकसंवाद /- कणकवली.
कणकवली शहरातील फ्लाय ओव्हरब्रिज ची बॉक्सवेल भिंत मागील काही वर्षापूर्वी कोसळली होती. त्यानंतर एस एम हायस्कूल/ मंजुनाथ हॉटेल ते मनोहर शिल्प दरम्यान असलेली बॉक्सवेल भिंत पावसाळ्यात खचून ओव्हरब्रिज वरील दोन्ही बाजूची वन वे वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र या प्रकारानंतर कणकवली वासीयांनी तसेच तालुक्यातील गांगो मंदिर परिसरातील नागरिकांनी बॉक्सवेल ला केला होता. एकीकडे फ्लाय ओव्हरचे काम नित्कृष्ट दर्जाचे होते.तर दुसरीकडे प्राधिकरणाने व ठेकेदाराने केलेला मनमानी कारभार शहराव यांच्या जीवावर बेतणारा होता.
असे असताना कणकवलीतील मंजुनाथ हॉटेल ते मनोहर शिल्प दरम्यान असलेली बॉक्सवेल भिंत ही वादाच्या विळख्यात राहिली. अनेक वेळा लक्ष वेधून सदर कामाला मुहूर्त मिळाला आणि मंजुनाथ हॉटेल ते मनोहर शिल्प दरम्यान असलेली बॉक्सवेल भिंत काढून वाय बीम फ्लाय ओव्हर ब्रिज ची मागणी जोर लावून धरली. कणकवलीतील बॉक्सेल पुलाच्या जागी वाय बीम फ्लाय ओव्हर ब्रिज झालाच पाहिजे या मागणीसाठी कणकवलीतील सर्वपक्षीय नागरिक व विविध सामाजिक संघटना यांनी या मागणी करिता गांगो मंदिर येथील अंडरपास मध्ये आंदोलन छेडले.
या आंदोलन प्रसंगी जोरदार घोषणाबाजी देत “झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, बॉक्सेल ब्रिजच्या जागी वाय बिंम फ्लाय ओव्हर झालाच पाहिजे” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या मागणीबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार या ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नागरिक आबा दुखंडे यांनी देखील वाय बीम फ्लाय ओव्हर ब्रिज ची मागणी लावून धरली. तसेच ही मागणी मान्य होईपर्यंत बॉक्सेलचे काम करू देणार नसल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
आंदोलनावेळी अनंत पिळणकर, भूषण परुळेकर, निलेश गोवेकर, लवु परुळेकर, प्रदीप मांजरेकर, सुजित जाधव, विनोद मर्गज, आबा दुखंडे, हरीश उचले, कन्हैया पारकर, सोमा गायकवाड, कुंदन हर्णे, राजू राठोड, सेवानिवृत्त तहसीलदार रत्नाकर पाटील, मंगेश जाधव, अखिल राजी, अंजली पाटील, विभावरी रेवडेकर, मिलींद बेळेकर, बाळू पारकर, प्रदीपकुमार जाधव, संजय एकावडे, सतीश सामंत, प्रकाश दळवी, गायत्री परुळेकर, मृणाल परुळेकर, महेश कोदे आदी उपस्थित होते.
मात्र यावेळी आंदोलनाचे निवेदन कणकवली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा • दिल्यामुळे सदर आंदोलन विषयाबाबत हायवे प्राधिकरण व ठेकेद यांच्याशी पोलीस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक यांनी हायवेच्या स अधिकाऱ्यांना संपर्क केला असता आपल्याकडे संबंधित कामाचे मात्र यावेळी आंदोलनाचे निवेदन कणकवली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दिल्यामुळे सदर आंदोलन विषयाबाबत हायवे प्राधिकरण व ठेकेदार यांच्याशी पोलीस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक यांनी हायवेच्या संबंधीत अधिकाऱ्यांना संपर्क केला असता आपल्याकडे संबंधित कामाचे कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसल्याचे सांगितले.
मात्र शनिवार, रविवार हे दोन दिवस सुट्टीचे असल्याने संबंधीत अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेट देणे शक्य नसल्याचे देखील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. दरम्यान आपण पुन्हा निवेदने देऊन आंदोलन करणार असल्याचे देखील आंदोलनकर्त्यांनी सांगितले.रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, तसेच माजी.पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खास.विनायक राऊत आणि इतर मंत्री यांच्या निदर्शनास ही बाब लवकरच आणून देणार तोपर्यंत या ठिकाणी कोणतेही काम सुरू करू देणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.