आज छेडणार गांगो मंदिर कडील अंडरपास मध्ये आंदोलन..
✍🏼 लोकसंवाद /- कणकवली.
कणकवली शहरातील गांगोमंदिर जवळील बॉक्सेल ब्रिज हटविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार असताना आता पुन्हा या ठिकाणी बॉक्सेल ब्रिज करण्या ऐवजी वाय ब्रिज करावा या मागणी करिता कणकवली – गांगोवाडी, कणकवली मधील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने गांगो मंदिर कडील अंडरपास मध्ये आज सकाळी 11 वा. पासून आंदोलन करणार असल्याची माहिती येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्तेव राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी निलेश गोवेकर यांनी दिली. दरम्यान या आंदोलना बाबत आज नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, नगरसेवक शिशिर परुळेकर, विनोद मर्गज, सचिन म्हाडगुत, सतीश सामंत, लवु परुळेकर, मिलींद बेळेकर, शेखर चव्हाण, आदी उपस्थित होते अशी माहिती श्री. गोवेकर यांनी दिली. या आंदोलनात कणकवली वासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री. गोवेकर यांनी केले आहे.