संजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसमध्ये खळबळ

संजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसमध्ये खळबळ

कोल्हापूरः /-

मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपात यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात कधीही न पाहिलेला सत्तासंघर्ष दिसून आला.
एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले आणि सत्ता स्थापन केली होती.या सर्व घडामोडीत शिवसेना नेते संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची होती.
दरम्यान, आज सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये दुपारी १.३० ते ३.३० वाजता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. याबाबत खासगी वूत्तवाहीनीने बातमी दिली आहे. ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी काय चर्चा केली याबाबत खुलासा झाला नाही. मात्र या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आलं आहे.मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना प्रकरणावरुन भाजपाला निशाणा साधला होता, सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल संजय राऊतांनी भाजपावर आरोप केले होते. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचेही नाव जोडण्यात येत होते, मात्र आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंह प्रकरणाशी माझा संबंध नाही असं पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं होतं.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी एक शायरी ट्विट केली होती, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, “किसी भी रिश्ते को कितनी भी ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए…अगर नज़रों में इज़्ज़त और बोलने में लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है” त्यामुळे संजय राऊत यांना नेमका कोणाबाबत हा संदेश द्यायचा आहे या प्रश्न आहे. मात्र आजच्या बैठकीने हे संकेत दिलेत का अशीही चर्चा आहे.

शिवसेना आणि भाजपा पुन्हा सत्तेसाठी एकत्र येणार?

शिवसेनेने आपल्या मूळ विचारधारेच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे विराजमान झाले, मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपाने प्रयत्न केला, त्यानंतर शिवसेनेने भाजपावरही निशाणा साधला. मात्र या भेटीनंतर शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.दोन विरोधी पक्षांचे नेते कधी एका कार्यक्रमात एकत्र येणार असतील तर त्यांची भेट होते, अशाप्रकारे कोणतीही गुप्त बैठक होऊ शकत नाही, लपवाछपवी करण्याचं कारण नाही, संजय राऊत यांच्यासोबत बैठक झाली हे आम्हाला काहीही माहिती नाही, भाजपा-शिवसेना सध्या एकत्र येतील असं वाटत नाही, दोन्ही पक्ष राजकीय मार्गातून खूप दूर झाल्याचं दिसतंय, पण राजकारणात काँग्रेस-शिवसेना एकत्र येऊ शकते, तर शिवसेना-भाजपा एकत्र येऊ शकतील, पण संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एका बैठकीत शिवसेना-भाजपा जवळ येईल असं वाटत नाही असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली.

अभिप्राय द्या..