✍🏼लोकसंवाद /- मालवण.
बाळासाहेबांची शिवसेनाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख पदी संजय आंग्रे यांची निवड झाल्यानंतर मालवण येथी बबन शिंदे यांची मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी नियुक्ती अन्य नियुक्त्याही जाहीर करण्यात आली आहे.जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षांचे पदाधिकारी निवडी जाहीर झाल्या आहेत.मालवण येथील महेश राणे यांची बाळासाहेबांची शिवसेना मालवण तालुका प्रमुखपदी नियुक्ती (आचरा, आडवली, मसुरे,सुकळवाड) तर विश्वास गावकर यांची बाळासाहेबांची शिवसेना मालवण तालुका प्रमुखपदी नियुक्ती (मालवण शहर, देवबाग, कट्टा, पेंडूर), बबन शिंदे यांची मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
