✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
कुडाळ तालुका शालेय क्रीडा कॅरम स्पर्धे मध्ये डॉन बॉस्को हायस्कूलची विद्यार्थिनी दुर्वा दिलीप राणे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. दुर्वा ही ओसरगाव ची रहिवासी असून घरात आपल्या कुटुंबातील वडील आजोबा काका यांचा कॅरम खेळातील निपुणतेचा वारसा पुढे नेत आहे. युवक कल्याण पतसंस्थेचे मॅनेजर दिलीप राणे यांची ती सुकन्या आहे. दुर्वा हिचे वडील दिलीप हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कॅरम पटू आहेत. दुर्वाच्या या यशाबद्दल कुडाळ तालुक्याच्या वतीने व ओसरगावच्या वतीने अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. 17 वर्षाखालील मुलींमध्ये दुर्वाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये 200 खेळाडूंनी भाग घेतला होता कुडाळ तालुक्याच्या सर्व हायस्कूलचा सहभाग होता.
