सावंतवाडी /-
उमेश उर्फ अभिषेक प्रसाद सावंत याने महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण ( म्हाडा ) ने सन २०२१ मध्ये घेतलेल्या सरळ सेवा भरती परीक्षेत उत्तुंग यश मिळविल्याने त्याची म्हाडाच्या सहाय्यक अभियंता (स्थापत्य ) पदी निवड झालेली असून काल रोजी मुंबई,नरिमन पॉईंट, यशवंतराव चव्हाण सभागृह येथे माननीय मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री वगैरे यांचे उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात त्याला म्हाडाच्या मुंबई वांद्रे येथील मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ या कार्यालयाकरिता निवड झाल्याचे नियुक्तीपत्र मिळालेले आहे.
उमेश उर्फ अभिषेक हा सिंधुदुर्ग मधील सावंतवाडी येथील युवक असून वयाच्या २६ व्या वर्षी त्यानें हे यश संपादन केल्याने त्याचे भरभरून कौतुक होत आहे वडील प्रसाद सावंत हे पोलीस (LCB) हवालदार म्हणुन कार्यरत आहेत तर आई डॉक्टर असा संस्कारी परिवार असून उमेश उर्फ अभिषेक हा लहान पणा पासून अभ्यासू असल्याने त्यानें हे यश संपादन केल्याचे दिसतं आहे.
