कुडाळ/-
कुडाळ येथील सौरभ स्पोर्ट्स खेळाडूंची राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे आज त्यांचे कुडाळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब व विशाल सेवा फौंडेशन तर्फे तसेच कुडाळ भाजपा यांच्या वतीने खो खो खेळाडूंना आर्थिक मदत करण्यात आली व त्यांच्या सर्व प्रवासाची जबाबदारी कुडाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आला.आज रोजी कुडाळ सेल्फी पॉईंट ह्या ठिकाणी त्या सर्व खेळाडूंना मदत सुपूर्त करण्यात आली.
त्यावेळी उपस्थित खो खो खेळाडू तसेच भाजपा जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश तेंडुलकर,शहर अध्यक्ष राकेश कांदे,युवा मोर्चा ता अध्यक्ष पप्या तवटे,उपाध्यक्ष चंदन कांबळी,सोशल मीडिया युवा संयोजक राजवीर पाटील,नगरसेवक ऍड राजीव कुडाळकर,विलास कुडाळकर,नगरसेविका नयना मांजरेकर, कु.चांदणी कांबळी,युवा मोर्चाचे संदेश सुकळवाडकर,श्रावण शिरसाट,अनुप जाधव,राम बांदेलकर,विलास वराडकर,प्रसन्न गंगावणे आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.