कुडाळ भाजप युवा मोर्चा कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन
कुडाळ /-
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून तसेच अशोक स्तंभाच्या जागी राणे साहेबांचा फोटो ईडीत करून संविधानाचा अपमान केल्याबद्दल तात्काळ सदर व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अश्या मागणीचे कुडाळ भाजपा युवा मोर्चाने निवेदन आज कुडाळ पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्याकडे निवेदन दिल आहे. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते असून त्यांच्या बाबत फेसबुक व ट्विटरवर सोशल मीडियावर दिनांक 27/10 2022 रोजी कु. मेघना सडवेलकर ट्विटर कु.आयोध्या पोळ पाटील या दोघांनी मिळून सन्माननीय राणेसाहेबांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून तसेच अशोक स्तंभाच्या जागी राणे साहेबांचा फोटो एडिट करून संविधानाचा अपमान केल्याबद्दल तात्काळ ह्या व्यक्ती वरती गुन्हा दाखल करावा.
ह्या मागणीचे निवेदन आज कुडाळ भाजपा युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आले.जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत,जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन तेंडुलकर, सरचिटणीस रुपेश बिडये,जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूळकर,सोशल मीडिया युवा जिल्हा संयोजक राजवीर पाटील,युवा मोर्चाचे संदेश सुकळवाडकर,सोशल मीडिया ता संयोजक राम बांदेलकर,प्रसन्न गंगावणे आदी उपस्थित होते.