कोल्हापूर/-
कोरोनाव्हायरसचा परिणाम जगातील सर्व उद्योगांवर आणि अर्थव्यवस्थांवर झाला आहे. छोट्या- मोठ्या उद्योग अन व्यावसायिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे.बहुतांश कंपन्या त्यांच्या कार्यालयावर प्रचंड रक्कम खर्च करतात.पण आता कोरोना, लॉकडाऊन यामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कॉर्पोरेट्स, स्टार्टअप्स, छोट्या-मोठ्या कंपन्या असे सर्वजन ऑफिस आणि त्याच्या व्यवस्थापनावरील खर्च कमी करू पहात आहेत. बर्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे, पण ‘वर्क फ्रॉम होम’ला देखील काही मर्यादा आहे, त्यामध्ये कर्मचारी पूर्ण क्षमतेने आपले काम करू शकत नाही आणि त्याचा कंपनीच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातूनच उदयाला आली आहे Level6 ची ‘को-वर्किंग स्पेस’ अभिनव संकल्पना.
Level6 ची ‘को-वर्किंग स्पेस’ ही सुविधा अशा कंपन्यांसाठी प्रभावी ठरणार आहे, ज्यांना आपल्या कर्मचाऱ्याचे मानसिक आरोग्य जपण्यासह त्यांना काम करण्यास प्रोत्साहित करण्याची इच्छा आहे. ‘को-वर्किंग स्पेस’चा वापर केल्यास कॉर्पोरेट्स, स्टार्टअप्स, छोट्या-मोठ्या कंपन्यांचा कार्यालय आणि त्याच्या व्यवस्थापनावर होणाऱ्या खर्चात मोठी काटकसर होणार आहे. खर्चात काटकसर झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होणार आहे. विशेष म्हणजे याठिकाणी कर्मचार्यांना ऑफिस वातावरणात काम करता येणार आहे. त्यामुळे आता कोणालाही कोल्हापुरातील ‘प्राईम लोकेशन’मध्ये स्वतःचे ऑफिस सुरु करणे सहज शक्य आहे. Level6 ची ‘को-वर्किंग स्पेस’ कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक आणि बसस्थानक (सीबीएस स्टँड) हाकेच्या अंतरावर असून राष्ट्रीय महामार्गही खूप जवळ आहे. इतकेच नव्हे तर covid -१९ च्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने सांगितलेल्या सुरक्षा नियमांचे येथे विशेष पालन केले जाते. एकूणच कर्मचाऱ्यासाठी ऑफिसचे वातावरण आणि सोबतच सुरक्षित, आरोग्यदायी व्यवस्था यामुळे Level6 ‘को-वर्किंग स्पेस’ कॉर्पोरेट्स, स्टार्टअप्स, छोट्या-मोठ्या कंपन्यांचा नक्कीच पसंतीस उतरेल, यात शंका नाही.
Level6 ‘को-वर्किंग स्पेस’ ही अभिनव संकल्पना ख्यातनाम उद्योगपती उप्पल शाह यांनी सुरु केली आहे. या संकल्पने विषयी बोलताना उप्पल शाह म्हणाले की,आम्ही कोल्हापुरात कॉर्पोरेट्स, स्टार्टअप्स आणि छोट्या – मोठ्या कंपन्यासाठी कमी किमतीत कॉर्पोरेट पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत. Level6– ‘को-वर्किंग स्पेस’ हि केवळ जागा नाही. या माध्यमाचा वापर करून उद्योजक आपली स्वप्ने करू शकतात. व्यवसाय सुरक्षा, स्थिरता आणि अत्यल्प खर्चात कॉर्पोरेट संस्कृतीचा भाग होता येणार आहे.
Level6 मध्ये प्राईम लोकेशन, हाय-स्पीड वायफाय,
दर्जेदार प्रिंटर्स,
कार्यक्षम सहकारी,
अत्यल्प किंमत,
स्नॅकची व्यवस्था,
स्वच्छ वातावरण,
प्रशस्त बैठक व्यवस्था आदी सुविधा मिळणार आहेत.इच्छुकांनी
9055115511 / 0231-6688880 या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.