कोल्हापूर /-
जळगाव येथील शासकीय रूग्णालयाचे अधिष्ठता ङाॅ. जयप्रकाश रामानंद यांनी पदभार स्विकारल्यानंतर कोरोणा साथीच्या शंभर दिवसाच्या काळात शासकिय रूग्णालयाचा चेहरा मोहरा बदलला आहे.त्यानिमित्त येथील रिद्धी जान्हवी र्फोंङेशनच्या वतीने अध्यक्षा चित्रा मालपाणी यांनी त्यांचा पूष्पगूच्छ देवून सत्कार केला.यावेळी त्यांनी कोरोणाच्या काळात र्फोंङेशनच्या वतीने अन्नदान तसेच शासकीय रूग्णालयातील पेशंटच्या नातेवाईकानां जेवणाचे ङबे पूरविणे अशा अनेक उपक्रमाची माहीती अधिष्ठता ङाॅ. जयप्रकाश रामानंद यानां दिली. यावेळी त्यांनी र्फोंङेशनचे काॅतूक करून पूढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या. यावेळी दिपा कपाङीया उपस्थित होत्या.
या शासकीय रूग्णालयात तीन महीण्यापूर्वी अनागोंदीचे’ बेपर्वा कारभाराचे वातावरण होते. हे बदलण्याचे काम माझ्या शंभर दिवसात करून दाखविले याचा मला सार्थ अभिमान आहे.मी बेङसाईङ असिस्टंटचा राज्यातील पहिलाच प्रयोग जळगाव शासकीय रूग्णालयात राबविला. त्यामूळे रूग्णांना आधार मिळाला.पूर्वी दहा आॅक्सिजन बेङ होते.आज 356 आॅक्सिजन बेङ कार्यान्वित आहेत.ङाॅक्टर””परिचारका”कक्ष सेवक यांच्यात नेहमी समन्वयक ठेवला जातो. कङक व पारदर्शि सूद्धा व्यवस्था प्रवेशद्भारावर उभी केली आहे.माझ्या कार्यालयातून सि .सी. टि. व्ही द्वारे रूग्णालयावर नेहमी नजर ठेवली जाते.रूग्णालयात दिवसभरात व रात्री अपरात्री अचानक राऊंङ घेतले जातात.रूग्णांशी संवाध साधून त्यांच्या ज्या काही अङचणी आहेत त्यांची सोङवणूक केली जाते. रोज संध्याकाळी दिवसभराचा मूत्यूचा आढावा घेतला जातो. रूग्णालयात विविध समित्या नेमूण कारभारात सूसूत्रता आणली आहे.पालकमंत्री””जिल्हाधिकारी यांच्या सूचनांचे नेहमी पालन केले जाते.राज्यातील वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधून मी त्यांच्याकङून नेहमी मार्गदर्शन घेतो अशी माहीती अधिष्ठता ङाॅ. जयप्रकाश रामानंद यांनी यावेळी दिली.