दोडामार्ग /-
गणेश चतुर्थी नंतर कोकणवासीयांसाठी नवरात्रौत्सव हा सण मोठा मानला जातो, नवरात्रीचे नऊ रंग साजरे करत प्रत्येक रंगाला एक वेगळा दर्जा देत हा सण साजरा केला जातो अशीही अनेक वर्षांची प्रथा या नवरात्रौत्वात आपणास दिसून येते दोडामार्ग तालुक्यातील दुसरी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे गाव म्हणजे भेडशी या गावात गेल्या काही वर्षांपासून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो,नवरात्रौत्सव हा भेडशी येथे साजरा होत असला तरी भेडशी लगतच्या गावांना देखील याची ओढ आणि जिव्हाळ्याची उत्सुकता लागून राहिलेली असते म्हणून येथे भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते तसेच अनेक भक्तगणांचा यात समावेश असतो यामुळे भेडशीच नव्हे तर भेडशी येथील इतरस्त लगतचे गाव देखील भक्तिमय वातावरणात दंग असतात यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते.
अनेक कार्यक्रमांमुळे भक्तगणांमधील उत्साह सतत वाढताना दिसत आहे प्रत्येक व्यक्ती आपली सुखदुःख बाजूला ठेवून या उत्साहात सामाविष्ट होताना दिसत आहे असाच हा उत्साह कायम ठेवण्यासाठी इतरस्त ही गावातील लोकांनी देवीच्या दर्शनास आवर्जून यावे असे आवाहन भेडशी येथील मंडळ अध्यक्ष मितुन बेळेकर यांनी केले आहे.
