दोडामार्ग /-

तिलारी येथे आंतरराज्य धरण प्रकल्प आहे. निसर्गाचे अद्भुत चमत्कार आहेत. शुद्ध हवा, मुबलक पाणी, वीज निर्मिती प्रकल्प या साऱ्या बाबी असताना देखील हा भाग मात्र ओसाड पडलेला आढळतो हा भाग विकसित करा आम्हाला रोजगार द्या म्हणून या भागातील अनेक युवक युवती एकत्र आले आहेत. नुकतीच “तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंच” ची स्थापना करण्यात असून सोशल माध्यमावर मंचच्या नावाने ग्रुपची स्थापना करण्यात आली असून तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मंच मध्ये कोणतीही कार्यकरणी नसून सर्व सदस्यांना समान दर्जा असून “आम्हाला रोजगार द्या” ही मागणी आहे. शिवाय फक्त रोजगार द्या असे न मागता काय करता येईल तिलारीत याचा स्पेशल ‘डाटा’ सुद्धा मंचने तयार केला आहे. लवकरच हा डाटा पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, शिवाय स्थानिक खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांना देण्यात येणार आहे. या मंचमध्ये तूर्त शंभर सदस्यांची नोंदणी झाली असून हा आकडा वाढत आहे अशी माहिती मंचच्या वतीने देण्यात आली.
जगातल्या भारी पर्यटन स्थळात तिलारीचा अधिकृत सामावेश नसताना जगभरातील पर्यटक तिलारीत येतात. एक काळ गजबजलेली तिलारी ओसाड पडली आहे. मंच सुचवीत असलेल्या कामच्या दहा टक्के कामे झाली तर “आपली तिलारी गोव्याला भारी” अशी स्थिती होईल असे मचंचे म्हणणे आहे.


तिलारी हे आंतरराष्ट्रीय धरण आहे पण आजची अवस्था वाईट आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
जे एक शिंगी गेंड्या साठी प्रसिद्ध आहे. आणि ते ब्राम्हपुत्रच्या खोऱ्यात वसलेले आहे.. त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची कुंपणे घातली नाहीत किंवा लोकांची जागा देखील संपादन केलेली नाही. तिथे प्रतिदिना हजार पर्यटक येतात ज्यांचे व्यवस्थापन तेथील स्थानीक ग्रामस्थ करतात. तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचचे सदस्य तिथे गेले त्यांनी घरगुती रूमभाडे काही तासांसाठी एक हजार रुपये दिले. गाडी स्थानिकाची घेऊन फिरले स्थानीक हॉटेलमध्ये जेवले.. बघा विचार करा एक हजार पर्यटक आले तर किती स्थानीकाना रोजगार मिळाला आणि हो येथे जवळपास स्थानीकाच्या 150 टॅक्सी भाड्याला आहेत रोटेशन पद्धतीने प्रत्येकाला भाडे मिळते त्यामुळे सर्वजण समाधानी होतात हे सहज तिलारीत होऊ शकते
तिलारीच मुबलक पाणी आहे आणि येथे तर किती पर्यटक येतात हे आम्ही सांगायची गरज नाही, तिलारीत सहज होऊ शकते. अशा अनेक मागण्या स्वप्न रुपी घेऊन तिलारी रोजगार मंच एकत्र आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page