वेंगुर्ला /-
जि.प.प्रा.शाळा मातोंड वरचेबांबरचे इशांत रामचंद्र परब,भक्ती सुहास कोरगावकर, व दिया नंदकिशोर परब असे तीन विद्यार्थी राज्यस्तरीय कबबुलबुल परिक्षेत उतीर्ण झाले. भारत स्काऊट गाईड अंतर्गत या शाळेतील कबबुलबुल पथकाने सलग सहा वर्षांपासून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. हि परिक्षा विभागीय स्तरावर रत्नागिरी येथे होत असते परंतु यावर्षी कोवीड-१९ पार्श्वभूमीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा स्काऊट गाईड कार्यालय येथे मार्चमध्ये घेण्यात आली होती. यावेळी चाचणीप्रमुख म्हणून शुभांगी तेंडोलकर हे होते. या विद्यार्थ्यांना कबमास्टर श्री. सुभाष साबळे, फ्लॉकलीडर सौ.वैशाली साबळे व मुख्याध्यापक श्री पवन अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.हे यशस्वी विद्यार्थी राष्ट्रीय सुवर्णबाण परिक्षेला पात्र होतील. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग भारत स्काऊट गाईड जिल्हासंस्थेने पत्राद्वारे तसेच मातोंड सरपंच सौ.जानवी परब,ग्रा.प.सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री नंदकिशोर परब,व पालक यांनी विशेष अभिनंदन केले.