सोलापूर
सांगेली माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक हनुमंत लक्ष्मण नाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार 31 जुलै रोजी कोल्हापूर येथील ताराबाई पार्क सभागृहात होणाऱ्या राष्ट्रीय ग्लोबल प्रेरणा गौरव पुरस्कार – 2022 या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
मुळचे देवसू येथील आणि सध्या कुडाळ औदुंबरनगर येथे वास्तव्यास असलेले श्री. हनुमंत लक्ष्मण नाईक एम.ए. बी .एड पदवी धारक असुन गेली 22 वर्ष सुरुवातीपासून ते आतापर्यंत सांगेली येथे एकाच शाळेत कार्यरत आहेत. शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी मुलांना ते मार्गदर्शन करतात. त्यांनी हस्ताक्षर सुधार प्रकल्प राबवले आहेत.तसेच
खेळांमध्येही मुलांना मार्गदर्शन करतात. त्यांनी पर्यावरण विषयाचे तालुकास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम कले असुन शालेय वसतिगृहामध्ये रेक्टरची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतात. दरवर्षी गरीब व होतकरू मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणासह दहावी- बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके देतात. तसेच शुद्ध पाण्यासाठी शाळांना RO वॉटर प्युरिफायर भेट, आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप आणि आर्थिक सहाय्य तसेच प्राथमिक शाळांना डिजिटल साहित्य वितरण करतात. त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे हनुमंत नाईक यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर त्यांचे देवसु ग्रामस्थ, सांगेली महाविद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र घावरे, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी वर्ग ,पालक आदिंसह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.