कुडाळ /-
पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री बाबा निवतकर यांना मच्छिंद्र कांबळी यांच्या रूपाने परिस स्पर्श झाला आणि कायापालट होऊन गेला.बाबा निवतकर यांनी कांबळींसोबत बरेच नाट्यप्रयोग साकारले आहेत. संगीत नाटक, सामाजिक नाटकांमधून त्यानी केलेला अभिनय जनतेसमोर आला आहे. महाराष्ट्राच्या बाहेरही बरेचसे प्रयोग त्यांनी सादर केलेले आहेत ,छोट्या पडद्यावरही बऱ्याचश्या भूमिका साकारलेल्या आहेत ,या कार्याचा सन्मान म्हणून मानाचा अष्टगंध नाट्य पुरस्कार त्यांना देऊन मुंबई येथे गौरविण्यात आले आहे .गावात आल्याबरोबर त्यांनी पाट हायस्कूलला भेट दिली .त्यावेळी इयत्ता आठवीच्या वर्गासाठी अभिनयाचा तास घेतला. पाट हायस्कूलमध्ये विद्यार्थी दशेतील विविध प्रसंग विद्यार्थ्यांना कथन केले ,कोणत्याही कलेची आवड असेल तर आपण न लाजता त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. पाट हायस्कूलचे मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध कलाविषयक उपक्रमांचे त्याने कौतुक केले. छोट्या छोट्या भूमिका, वक्तृत्व स्पर्धा यामधून आपला स्टेजवरचा वावर वाढवला पाहिजे त्यामधून एक धाडस निर्माण होते .हा महत्त्वाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अष्टगंध नाट्य पुरस्कार मिळाल्याबद्दल कलाशिक्षक श्री संदीप साळसकर यांनी पुष्प घेऊन अभिनंदन केले. त्याचप्रमाणे या पुरस्कारा ने सन्मानित माजी विद्यार्थी म्हणून विद्यालय आणि संस्थेच्या वतीने ही श्री .बाबा निवतकर यांचे अभिनंदन करण्यात आले.
