वेंगुर्ला /-

आज दिनांक २१/०७/२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्ला यांना उभादांडा ग्रामस्थांनी धरले धारेवर.. वेंगुर्ला शिरोडा उभादांडा रस्ता हा पूर्ण खड्डेमय झाला असून वारंवार अपघात होत आहेत. प्रत्येक वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. कार्मिस आलमेडा निवेदन दिल्या नंतर तात्पुरती डागडुजी करून लोकांची फसवणूक करत आहेत. प्रत्येक वेळी निधी आणि माणसे कमी असल्याचे कारण फुडें हा विभाग करत आहे. उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल मध्ये तसेच हेळेकर मंदिर, सुखटनंवाडी, वरचेमाडवाडी मध्ये भले मोठे खड्डे पडले आहेत. बांधकाम विभाग तर्फे गणपती मंदिर ते केपादेवी पर्यत रस्ता मंजूर असल्याचे श्रीम. मुळे मॅडम तसेच श्री. भगत ( संबंधित अधिकारी ) यांनी पत्र दाखविले. परंतु अद्याप पर्यंत कामाला सुरुवात नं केल्यामुळे ग्रामस्थानी चांगलेच धारेवर धरले. कोणतेही कारण ऐकण्यासाठी आम्ही येथे आलो नाही. मच्छिमार बांधव, शेतकरी, शाळेतील मुलं, रिक्षा व्यवसायिक, तसेच सर्व सामान्य लोकांना ह्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पूर्ण रस्त्यावर झाडी वाढली असून ती तोडली नाहीत गटार सफाई केली नाही असे प्रश्न उपस्थित केले गेले. ह्या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. कार्मिस आलमेडा,सामाजिक कार्यकर्ते श्री. हितेश धुरी, उभादांडा ग्रामपंचायत सदस्य श्री. गणेश चेणवनकर, श्री. दया खर्डे, श्री. आनंद मेस्त्री, श्री. धावडे श्री. बळी कुबल, श्री. विनायक रेडकर, श्री. दीपक जुवलेकर, ह्यांनी निवेदन दिले. निवेदनात जवळ पास ४० ते ५० लोकांनी ह्या स्वाक्षरी केल्या होत्या. येत्या ८ दिवसात अंमलबजावणी नं झाल्यास रास्ता रोको करण्यात येईल असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page