आंबोली /-
येथील घाटात गटारीचे काम यावर्षी झाले नाही.ठिकठिकाणी वेली रस्त्यावर लोंबकळत आहेत.धोकादायक झाडे तोडली नाहीत.अळू गटार काम झाले नाही यामुळे मोरी जाम होवून घाट दरिकडचा भाग खचू शकतो.सार्वजनिक बांधकाम विभाग वनविभाग यांना सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आंबोली प्रभारी सरपंच दत्तू नार्वेकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.
