कुडाळ /-
केरवडे येथील पूर्ण प्राथमिक शाळा क्र एक व दोन येथील सर्व विद्यार्थ्यांना फळ कलम रोपे वाटण्यात आली. विद्यार्थ्यांना ही रोपे वाटप करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वृक्षसंवर्धन वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन त्याची जागरूकता व्हावी वृक्ष लागवडीचे महत्व मुलांना समजावे त्या दृष्टीने हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमामध्ये मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी दिलेली ही वृक्ष आपल्या परस बागेत नेऊन याची लागवड करायची आहे. याचं संगोपन करायचा आहे, त्याच्याबरोबर सेल्फी काढून शिक्षक त्याचं रजिस्टर मेंटेन करतील. एक वर्षानंतर चांगलं संगोपन चांगल्या झाडाला वाढ झालेल्या झाडाला पहिल्या तीन क्रमांकांना बक्षीस देण्याचं धीरज परब यांनी सांगीतल, या कार्यक्रमाचे आयोजन मनसे केरवडे ग्रामपंचायत सदस्य सुशांत परब यांनी केले .. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष धीरज परब प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत ,राजेश माने,विनीत परब व इतर गावातील ग्रामस्थ ,शिक्षक उपस्थित होते.या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे..