कुडाळ /-
आज युवासेना जिल्हा कार्यकारिणीची बैठक कुडाळ येथे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी उपजिल्हा अधिकारी, सर्व तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख तसेच युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्व पदाधिकारी यांनी एक मताने आपण आदित्य साहेब तसेच उद्धव साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये ठामपणे उभे असल्याचे सांगितले व यापुढे युवासेनेच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण आणि रोजगार यामाध्यमातून अजून जोमाने पुढे नेऊन युवासेना तळागाळात पोहोचवण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी केला.
यावेळी सागर नाणोसकर, योगेश धुरी, योगेश नाईक, पंकज शिरसाट, संदीप महाडेश्वर, मितेश वालावलकर, दीपेश कदम,मायकल डिसोझा, नामदेव राणे, श्रीकांत राऊळ, दादा सारंग, वेदांत पेडणेकर, मंजुनाथ फडके, उत्तम नार्वेकर, विक्रांत नेवगी आदि उपस्थित होते.
