कुडाळ /-

ऋणानुबंध ग्रुप तर्फे पाट हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं तसचं अतिशय गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप सुध्दा करण्यात आलं. तसचं ऋणानुबंध ग्रूप मध्ये ज्या महिला सदस्य आहेत त्यांनी काही विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्सच वाटप करण्यात आलं. ह्या कार्यक्रमाला संस्थेतर्फे श्री देवदत्त साळगावकर खजिनदार श्री अवधूत रेगे श्री .राजेश सामंत पर्यवेक्षक श्री हंजनकर सर कलाशिक्षक श्री संदिप साळसकर सर, राणे मॅडम आणि शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते तसेच ऋणानुबंध ग्रूप तर्फे शंकर शिरसाट, चित्रा नेरुरकर, मयुर तवटे, आपा परब, प्रदिप पाटकर, गणेश जूवळे हे सदस्य उपस्थित होते. येत्या वर्षात बरेच कार्यक्रम शाळेत घेतले जाणार आहेत जेणेकरून विद्यार्थी भविष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देऊ शकतील. भविष्यातही विविध मुलांच्या हितोपयोगी कार्यक्रम ऋणानुबंध ग्रुप तर्फे विद्यालयात घेण्यात येतील असे ग्रुपचे सदस्य श्री भूषण तांडेल यांनी सांगितले श्री गणेश जुवळे यांनी सर्वांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page