मुंबई /-

राज्यातील सत्तेविरोधातील बंड आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून न्यायालयीन लढाईस रविवारी प्रारंभ झाला. शिवसेनेच्या मागणीनुसार 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीविरोधात बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितली आहे.या नोटीसला एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर आज सुनावणी होईल. यावेळी न्यायालयात देशातील हायप्रोफाईल वकिलांची लढाई रंगणार आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

हरीश साळवे यांचे नाव केवळ देशातच नाही तर जगातील सर्वात मोठ्या वकिलांमध्ये घेतले जाते. काही अहवालांनुसार त्यांचे एका दिवसाचे कामाचे शुल्क हे 30 लाखांच्या घरात आहे.

गेल्या वर्षी हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकिली केली होती. या प्रकरणात त्यांनी फक्त 1 रुपया फी घेतली होती. पण इतर वेळेस ते फक्त बड्या केसेसच घेतात आणि त्यात ते प्रत्येक तासाला काही लाख तर एका दिवसांसाठी 25 ते 30 लाख रूपये घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांच्या फीवरून कळून जाईल की साळवे हे किती मौल्यवान वकील आहेत.

साधारण 1980 मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. 1992 या वर्षात हरीश साळवे यांची दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.

1999 ते 2002 पर्यंत ते देशाला सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहत होते. हरीश साळवे यांचे आजोबा पी.के.साळवे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर होते. तर पणजोबा हे न्यायाधीश होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page