कुडाळ /-
तालुक्यातील गोठोस येथील जिल्हा परिषद शाळा नं:१ विद्यार्थ्यांना गोठोस गावचे रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रदीप घाडी यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील पूर्वतयारी उपक्रमा निमित्त वह्या वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या या अनेकविध उपक्रमाचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रदीप घाडी यांनी येथे बोलताना केले.
यावेळी मुख्याध्यापक श्री.तावडे गुरूजी,आदी शिक्षक कर्मचारी वर्ग तसेच शाळा कमिटी अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.
