You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस करणार टोलधाडीच्या विरोधात अनोखे आंदोलन.;अभय शिरसाट जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस करणार टोलधाडीच्या विरोधात अनोखे आंदोलन.;अभय शिरसाट जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 अपूर्णावस्थेत असताना टोल आकारणी विरोधात अनोखे आंदोलन उद्या ०२ रोजी सायंकाळी चार वाजता ओसरगाव टोल नाक्यावर करण्याचे ठरविण्यात आले.

या आंदोलनात सिंधुदुर्ग पासिंग MH07 व सिंधुदुर्गातील रजिस्टर झालेल्या सर्व वाहनांना टोल मुक्ती मिळावी. यासाठी “आमचं ठरलं” “आम्ही सिंधुदुर्गकर” “आम्ही टोल भरणार नाही” अशा प्रकारचे स्टिकर लावून सिंधुदुर्गातील वाहनांना टोल मुक्ती मिळविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने खास प्रयत्न करणार आहोत.

या आंदोलनातील पहिला भाग म्हणून सिंधुदुर्ग पासिंगच्या सर्व वाहनांवर “आमचं ठरलंय” अशा प्रकारच्या स्टिकर ओसरगाव टोलनाक्यावर लावण्यात येतील . त्यानंतर सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात गावागावा मध्ये सर्व वाहनांवर आम्ही टोल भरणार नाही अशा प्रकारचे स्टिकर लावून हे आंदोलन करण्यात येईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती न मिळाल्यास यापुढील काळात सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल. त्याला जबाबदार प्रशासन व केंद्र सरकार राहील.हे आंदोलन श्री साईनाथ चव्हाण माजी जिल्हाध्यक्ष, श्री विकास सावंत माजी जिल्हाध्यक्ष , श्री विलास गावडे कार्याध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस,श्री दिलीप नार्वेकर व प्रकाश जैतापकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल.
आंदोलनात सर्व पदाधिकाऱ्यांनी फ्रंटलच्या सर्व कार्यकर्त्यांनी व सिंधुदुर्गातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन अभय शिरसाट प्रभारी तालुका अध्यक्ष यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..