मालवण /-

मालवण बाजारपेठेतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या ए. टी. एम.वरील फ्लेक्स बोर्डच्या सर्किट बॉक्सला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना काल दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. मालवण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत फायर सिलेंडरच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली व मोठा अनर्थ टळला.आज दुपारच्या दरम्याने मालवण बाजारपेठेतील उच्च दाबाचा वीजपुरवठा निर्माण झाल्यामुळे याचा फटका दुकानदार व्यापाऱ्यांना बसला. त्यातच बँक ऑफ महाराष्ट्रच्या ए. टी. एम. समोर असलेल्या सर्किट बॉक्सला आग लागली आणि बँक कर्मचारी आणि इतर नागरिकांची तारांबळ उडाली. सर्किट बॉक्स मधून अचानक धूर व आगीच्या ज्वाला बाहेर पडताच बँक व्यवस्थापकांनी मालवण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. यावेळी प्रणव घोरपडे, मुकादम आनंद वळंजू हेमंत आचरेकर यांनी फायर सिलेंडरच्या साहाय्याने ही आग विझवली. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती व काही काळ बाँकेची ए. टी. एम. सुविधा बंद ठेवण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page