मालवण /-

मालवण तालक्यातील तारकर्ली वरचीवाडी महापुरुष मंदिर नजीकच्या एका बंद घराच्या खोलीत यशवंत उर्फ मनोज बुधाजी लोणे (वय-३१) या युवकाने आज सकाळी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.तारकर्ली वरचीवाडी येथे राहणारा यशवंत लोणे हा पूर्वी स्कुबा व्यवसायात होता. आज सकाळच्या सत्रात त्याने महापुरुष मंदिर नजीकच्या आपली मावशी मीनाक्षी कोळंबकर यांच्या बंद असलेल्या घरात जात गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page