मालवण /-

काल मंगळवारी मालवण मधील तारकर्लीच्या समुद्रात स्कुबा डायविंगची बोट पलटी होऊन दोन पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांत काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर गजानन स्कुबा डायव्हिंगचे बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०, रा. देवबाग) यांच्यासह अन्य पाच जण अशा एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत या बोटीतील पर्यटक लैलेश प्रदीप परब (वय ३६, रा. अणाव कुडाळ) यांनी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे.मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल तारकर्ली समुद्रात गजानन स्कुबा डायविंग सेंटरची बोट लाटांच्या तडाख्याने पलटी होऊन बोटीतील सुमारे २८ जण समुद्राच्या पाण्यात फेकले जाऊन दुर्घटना घडली होती. यात अकोला येथील आकाश भास्करराव देशमुख व पुणे येथील डॉ. स्वप्नील मारुती पिसे या दोन पर्यटकांचा नातातोंडात पाणी गेल्याने गुदमरून मृत्यू झाला होता.

तर अन्य पर्यटक जखमी झाले होते. या प्रकरणी पर्यटक लैलेश परब यांनी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यावर रात्री उशिरा बोट मालक, चालक व अन्य स्कुबा डायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बोट मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर (वय ५२, रा. तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (वय ५०, रा. देवबाग), सुयोग मिलिंद तांडेल (वय २३, रा. देवबाग), विकी फिलिप फर्नांडिस (वय ३२, रा. देवबाग), प्रथमेश रामकृष्ण बसंधकर (३१, रा. दांडी मालवण), तुषार भिकाजी तळवडकर (वय ३९, रा. तारकर्ली), विल्यम फ्रान्सिस लुद्रीक (वय ५४, रा. देवबाग) यांच्यावर भादवि कलम ३०४ (अ), ३३६, ३३७, २८०, २८२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक नरळे हे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page