You are currently viewing शुभम शांती रेसिडेन्‍सी कुडाळ मधील रहिवाशांचे नगरपंचायत व विकासक यांच्या संगनमताने सुरू असलेले सलून बंद करण्यासाठी निवेदन.

शुभम शांती रेसिडेन्‍सी कुडाळ मधील रहिवाशांचे नगरपंचायत व विकासक यांच्या संगनमताने सुरू असलेले सलून बंद करण्यासाठी निवेदन.

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नगर भूमापन क्रमांक 887, 888, 3159 मधील निवासी इमारत शुभम मधील फ्लॅटधारकांनी निवासी प्रयोजनासाठी फ्लॅट खरेदी केलेले असताना विकासक मे. सिध्दिविनायक डेव्‍हलपर्स व नगरपंचायत यांचे संगनमताने फ्लॅट क्रमांक ००६ मध्‍ये जेन्‍टस सलून व लेडिज पार्लर असा दुहेरी वापर तोही निवासी संकूलात राजरोस झाल्‍याने महिला रहिवांशांना होणारा त्रासाला कंटाळून रहिवाशांनी मा. जिल्‍हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका शाखा), कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी, नगरसेविका संध्या तेरसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. शुभम बिल्‍डींगमधील सदनिकाधारकांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून सदनिका खरेदी केलेल्‍या आहेत. असे असताना विकासकास ना रहिवाशांची काळजी, ना नगरंपचायतीस शहरांतील नागरिकांची फिकीर असे अनुभव सदनिकाधारकांस येऊ लागले. सदर इमारतीत निवासी ऐवजी सलूनकरिता वाणिज्‍य वापर सुरु करण्‍यात आलेला असल्‍याने इमारतीमधील महिला व विशेषकरुन किशोरवयीन मुलींना (रहिवाशांना) इमारतीचे आवारात फिरताना असुरक्षितता वाटू लागली. ही असुरक्षितता दूर करणेकामी व सदरचा अनधिकृत वापर तात्‍काळ बंद करणेकामी कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. शुभम इमारतीमधील कोणत्‍याही व्‍यावसायिक वापरात निवासी ऐवजी वाणिज्‍य / व्‍यावसायिक / औद्येगिक प्रयोजनाकरिता वापर बदल करण्‍यास परवानगी देण्‍यात येऊ नये. तसेच यापूर्वी सदनिकाधारकांना कोणतीही पूर्वकल्‍पना न देता वाणिज्‍य वापरास परवानगी दिलेली असल्‍यास सदर परवानगी रद्द करुन सदनिकाधारकांची होणारी फसवणूक थांबवावी अशी मागणी शुभम अपार्टमेंटमधील सदनिकाधारकांनी मा. जिल्‍हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका शाखा), कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी, नगरसेविका संध्या तेरसे यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.

अभिप्राय द्या..