You are currently viewing जल्लोष 2022 अंतर्गत बोट वल्हवण्याची स्पर्धा संपन्न..

जल्लोष 2022 अंतर्गत बोट वल्हवण्याची स्पर्धा संपन्न..

मालवण /-

मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्‍सव जल्‍लोष 2022 अंतर्गत दांडी समु्द्रकिनारी गुरुवार दि. 12 मे 2022 रोजी नौकानयन स्‍पर्धा अंतर्गत 18 फुट फायबर बोट व्‍हलवण्‍याची स्‍पर्धा घेण्‍यात आली. पर्यटक व स्‍थानिक मच्छिमारांनी नौकानयन स्‍पर्धेचा थरार अनुभवला. स्‍पर्धेच्‍या निमित्‍ताने मच्छिमारांनी आपले नौकानयन कौशल्‍य आणि ताकद पणाला लावून सर्वांचीच वाहवा मिळवली. या स्‍पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक एस.एस. ओटवणेकर यांच्‍या हस्‍ते झाले. नौकानयन स्‍पर्धेत एकुण पाच संघ सहभागी झाले होते. प्रत्‍येक संघात 3 स्‍पर्धकांचा समावेश होता.

अभिप्राय द्या..