कुडाळ /-

दत्तनगरमधील रहिवाशांच्या मागणीची पूर्तता करत कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार श्री वैभव जी नाईक यांनी कुडाळ नाबरवाडी ते दत्तनगर पर्यंत इलेव्हन केवी लाईन मंजूर करून दिलेले आश्वासन पूर्ण केले. या कामामुळे दत्त नगर मधील रहिवाशांची विजेची समस्या मिटणार आहे. या कार्यक्रमाचे भूमिपूजन आज सकाळी आमदार वैभवजी नाईक यांच्या उपस्थितीत श्री रामदास यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी भूमिपूजन प्रसंगी जिल्हाप्रमुख श्री संजय पडते, ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, एम एस ई बी कुडाळ शाखा अभियंता सौ. परब मॅडम , नगरसेविका श्रुती वर्दम, बाळा पावसकर, श्री राजू मुळीक , संदीप महाडेश्वर , राकेश वर्दम, अमित राणे, राजू गवंडे तसेच दत्तनगर मधील रहिवासी आनंद वालावलकर, विनायक पाटील, डी.बी ठाकूर, श्री लाड, रवींद्रनाथ सावंत, श्री हर्डीकर व कॉन्ट्रॅक्टर प्रकाश पावस्कर उपस्थित होते. काम तत्परतेने मंजूर केल्याबद्दल दत्तनगर मधील रहिवाशांनी आमदार श्री वैभव जी नाईक यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page