कुlडाळ /-

कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेस तर्फे भव्य सन्मान सोहळा माणगाव येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालक कृष्णा सावंत यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक श्री. रमाकांत सातार्डेकर(farmar producer company) सहकारतून कशी प्रगती साधता येते.. व विकास कसा साधता येतो हे त्यांनी पटवून दिले. त्याचप्रमाणे त्यांनी सह्याद्री agro, (नाशिक)यांनी कशी सहकारातून समृद्धी कडे वाटचाल करत आहे हे त्यांनी सांगितलं. आपल्या सह्याद्री पट्यात दुर्लक्षित असे कोकम व फणस वुक्षाच्या फळातील औषधी महत्व पटवून दिले.Adv.श्री. अशपाक शेख यांनी महिलांसाठी मोफत वकील जिल्हा विधी प्राधिकरण तर्फे दिला जातो त्यासाठी अर्ज कसा करावा हे त्यांनी सांगितले. मालमत्ता,लैगिक अत्याचार, कौटोबीक हिंसाचार… अशा अगणिक विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस श्री. चंद्रशेखर जोशी, कुडाळ तालुका अध्यक्ष श्री. अभयजी शिरसाट, महिला तालुका अध्यक्ष कु. सुंदरवल्ली स्वामी, कुडाळ तालुका युवक उपाध्यक्ष कु.गोविंद कुंभार,कुडाळ नगराध्यक्षा सौ. आफ्रिन करोल, कुडाळ सभापती सौ. अक्षता खटावकर, कुडाळ शहर अध्यक्ष सौ. शुभागी काळसेकर, महिला कार्याध्यक्ष सौ.सोनल सावंत, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष श्री. तोसिफ शेख उपस्थित होते. यावेळी जिल्यात आलेल्या सकटे कोविड, तौक्ते वादळ या काळात प्रभावीपणे काम केलेल्या डॉक्टर, नर्स, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व त्याचे मदतनीस, CRP यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉक्टर श्री. उमेश पाटीक(MO) सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तौक्ते वादळवेळी महाराष्ट्र राज्य विदयुत महामंडळ याची कामगिरी उल्लेखनिय आहे.यावेळी शाखा अभियता श्री.अनिल मठकर यांना विशेष सन्मानित कारण्यात आला.यावेळी प्रगतशील शेतकरी गांडूळ उत्पादन व विक्री म्हणून सौ. प्रभावती प्रकाश धुरी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page