You are currently viewing कुडाळ येथे सिंधु कृषी व पशूपक्षी प्रदर्शन १७ ते २० मे कालावधीत.;सीईओ प्रजित नायर यांची माहिती.

कुडाळ येथे सिंधु कृषी व पशूपक्षी प्रदर्शन १७ ते २० मे कालावधीत.;सीईओ प्रजित नायर यांची माहिती.

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधु कृषी व पशूपक्षी प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. १७ ते २० मे २०२२ या कालावधीत हे प्रदर्शन कुडाळ येथील नवीन बस स्टँड येथे आयोजित करण्यात आले आहे. यात विविध कृषी पशु विषयक स्टॉल, मार्गदर्शन चर्चा सत्र, विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन १८ मे रोजी राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली.

जिल्हा परिषद सिंधू कृषी व पशुपक्षी प्रदर्शन संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. विद्यानंद देसाई आदी उपस्थित होते.

सिंधू कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कुडाळ येथील नवीन बस स्टँड येथील मैदानावर १७ ते २० मे २०२२ या कालावधीत हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. १७ तारीख ला कृषी, पशु, खाद्य, बियाणे, यांत्रिकीकरण आदी प्रकारचे स्टॉल उभारून अनौपचारिक शुभारंभ केला जाणार आहे. याच दिवशी शोभायात्रा, स्थानिक लोककला, १८ मे रोजी बैलगाडी सजावट स्पर्धा, मुख्य उद्घाटन सोहळा याला राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे उपस्थित असणार आहेत. दुपारी पशुसंवर्धन चर्चा सत्र, फुगडी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, १९ मे रोजी कृषी विषयक चर्चा सत्र (बांबू लागवड, गोड्या पाण्यातील मासे पालन), श्वान स्पर्धा, पाक कृती स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, तर २० मे रोजी महिला मेळावा व चर्चा सत्र, बक्षीस वितरण व समारोप आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली.

अभिप्राय द्या..