जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्षाचा झुआरीला दणका
खत पुरवठा होणार पूर्ववत
गोवा मुख्यमंत्र्यांची ग्वाही..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यातून झुआरी केमिकल्स कडून खताच्या अनियमित पुरवठ्याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व गोवा बागायतदार संघाचे अध्यक्ष व माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी ७. ०० मुख्यमंत्री प्रमोद सावन्त यांनी झुआरी केमिकलचा कार्यकारी संचालक नितीन कंटक व जनसंपर्क अधिकारी आनंद राजाध्यक्ष याना आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावून माहिती घेत सकारात्मक चर्चा घडवून आणली. सिंधुदर्ग बँकेच्या शिष्टमंडळात मालवण संघाचे अध्यक्ष आबा हडकर,कणकवली संघाचे चेअरमन व बँकेचे संचालक विठ्ठल देसाई,कुडाळ संघाचे संचालक निलेश तेंडुलकर ,सावंतवाडी संघाचे बाबल ठाकूर , मालवण संघाचे गॅस विभाग प्रमुख चेऊलकर आदी उपस्थित होते.
अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सिंधुदुर्गतील शेतकरी झुआरी केमिकलचा मिश्र खताची नेहमीच शेतीसाठी तसेच बागायतीसाठी वाट बघत असतात .परंतु हि खते वेळीच उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले तसेच झुआरी केमिकलचा संबंधित अधिकारी हे खरेदी विक्री संघाना म्हणावे तसे सहकार्य करत नसून खताचा पुरवठा कधी होईल याचीही माहिती धड देत नसल्याचे झुआरीच्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १००० मेट्रिक टन युरिया तर २००० मेट्रिक टन मिश्र खतांची मागणी करण्यात आली . झुआरीच्या अधिकाऱ्यांनी १००० मेट्रिक टन युरिया आपण लगेचच उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया युक्रेन युद्धाच्या पार्शभूमीवर मिश्र खतांसाठी लागणार कच्या मालाच्या उपलब्धतेनुसार देऊ असे सांगितले परंतु सिंधुदर्ग जिल्ह्याच्या मिश्र खताच्या मागणीला आपण निश्चित प्राधान्य देऊ असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना सांगितले.
गोवा येथील बैठकीची तात्काळ दाखल घेत गोवा, सिंधुदुर्ग , रत्नागिरी व पश्चिम महाराष्ट्र या विभागाचे रिजनल मॅनेजर नागेश पाटील यांनी बँक अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर याच्याशी संपर्क साधून झुआरी केमिकलकडून १००० टन युरीया लगेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाना पाठवण्यात येत असून १२:३२:१६ हे मिश्र खत सुद्धा सर्व खरेदी विक्री संघाना उपलब्ध करून देण्यात येणार असून दुर्गम भागातील विकास संस्थाना लगेच खते पोच केली जातील असे सांगितले व सर्व खताचा पुरवठा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ जून पूर्वी पूर्ण करणार असल्याचे सांगितले. झुआरी कंपनीचे अधिकारी दिगंबर तेंडुलकर हे आजच बँकेत येऊन अध्यक्ष व उपाध्यक्षांची भेट घेणार असून मिश्र खतांसाठी झुआरी केमिकलनी घेतलेल्या पॅरॅदिप फॉस्पेट कंपनीची कागदपत्रे येत्या चार दिवसात पूर्ण करून घेणार आहेत. गेल्या तीन ते चार वर्षात झुआरी केमिकलकडून जिल्ह्यात खत पुरवठा अत्यल्प होत होता याची दखल घेत सिंधुदुर्ग बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी ,उपाध्यक्ष अतुल काळसेकर व संचालक मंडळांनी गंभीर दखल घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. वेंगुर्ला , मालवण , देवगड , किनारपट्टीवरील तसेच इतरही भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना याचा फार मोठा फायदा होणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपआपल्या भागातील विकास संस्थामार्फत तालुका खरेदी विक्री संघात खताची मागणी नोंदवून ते घेऊन जावे असे आवाहन या निमित्ताने सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर व सर्व संचालकांनी केले आहे. याचप्रमाणे येत्या काही दिवसातच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय केमिकल व फर्टीलायझरच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मनिष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सांगितले.
यावेळी सिंधुदुर्ग बँकेच्या वतीने अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी शाल श्रीफळ व आंबे देऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सत्कार केला व त्यांना सिंधुदुर्ग बँकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले .मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भेटीचे निमंत्रण स्वीकारले असून लवकरच ते सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग बँकेच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page