कुडाळ /-

राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर १४९ च्या नोटिसा देऊन शासनाकडून कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी सुरू आहे. मात्र आम्ही ठाकरे यांनी दिलेल्या आदेशांच्या पालनावर ठाम आहोत, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिला.ज्या ठिकाणी भोंग्याचा त्रास होत असेल त्याठिकाणी पोलिसांत तक्रार करा आणि आपल्या घरी हनुमान चालीसा वाजवा त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्या पोलीस परवानगी देत नसतील तर,न्यायालयात दाद मागू, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत श्री. परब यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, धर्मस्थळावरील विषेतः मशिदींवरील भोंगे खाली उतरवा या ठाकरे यांच्या मागणीनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील सत्तेत असलेल्या नेत्यांनी गरळ ओकायला सुरुवात केली. श्री. ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की भोंगे उतरवणे हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. मनसे कोणत्याही धर्माविरुद्ध नाही. श्री. ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर जिल्हाभरात पोलिसांकडून कार्यकर्त्यांना १४९ च्या नोटिसा दिल्या गेल्या आहेत.

मशिदिसाठी भोंग्याची परमिशन ही हायकोर्टाच्या नियमावली नुसार दिली जाते, परंतु त्याच हायकोर्टाच्या नियमा प्रमाणे घरामध्ये हनुमान चालीसा लावण्यास परवानगी नाकारण्यात येते याचा अर्थ हे हिंदूविरोधी सरकार असून आपली हुकुमशाही गाजवत आहे. सरकार एका वर्गाचा हट्ट पुरवण्या साठी यंत्रणेवर ताण देत आहे.

श्री. ठाकरे यांनी अपील केल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी लोकांना भोंग्याचा त्रास होत असेल त्यांनी १०० नं. वर फोन करुन तक्रार नोंदवा, तक्रार अर्ज पोलीस स्टेशन ला करा. आपल्या घरी / घराच्या छतावर हनुमान चालीसा वाजवा त्यासाठी रीतसर परवानगी घ्या. परवानगी नाकारली तर त्याचे लेखी उत्तर पोलीस प्रशासनाकडून घ्या. कोणतीही अडचण असल्यास किव्हा पोलीस सहकार्य करत नसल्यास आमच्याशी थेट संपर्क साधा, असे आवाहन श्री. परब यांनी केले आहे. तर न्यायालयाच्या आदेशाच्या चौकटित राहून पोलीस परवानगी नाकारत ल तर याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही श्री. धीरज परब म्हण|लें.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page