You are currently viewing कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै स्कूल ऑफ नर्सिंग मधील अंतिम वर्ष ए. एन .एम. आणि जी.एन.एम.चा निकाल १००%

कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै स्कूल ऑफ नर्सिंग मधील अंतिम वर्ष ए. एन .एम. आणि जी.एन.एम.चा निकाल १००%

कुडाळ /-


महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परा वैद्यकीय शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडून घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २९२१-२२ मधील अंतिम वर्ष जी. एन. एम. आणि ए. एन .एम .परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात बॅ. नाथ पै स्कूल ऑफ नर्सिंग अंतर्गत दोन शाखांचा निकाल जाहीर झाला अंतिम वर्ष ए .एन. एम .मध्ये एकूण बावीस विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. असून या शाखेचा एकूण निकाल शंभर टक्के एवढा लागला. यात कुमारी मंगल अवधूत पवार 75 पॉईंट 75 टक्के गुणांसह प्रथम ,कुमारी अक्षता रवींद्र काळे 74 पॉईंट २५ टक्के गुणांसह द्वितीय आणि कुमारी सिद्धी उमेश नेरुरकर 74 टक्के गुणांसह तृतीय येण्याचा मान मिळाला.
तसेच अंतिम वर्ष जी.एन.एम.ला एकूण १९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते यामध्ये १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा 94.4 टक्के निकाल लागला यात कुमारी सलोनी सुनील महाजन 78.5 गुणांसह प्रथम, कुमारी विनया विठ्ठल परब 75.8 टक्के गुणांसह द्वितीय,तर कुमारी दीप्ती दशरथ गावडे 73 टक्के गुणांसह तृतीय येण्याचा मान मिळविला .
या विद्यार्थ्यांना प्राचार्य सौ मीना जोशी उपप्राचार्या सौ कल्पना भंडारी स वैशाली ओटवणेकर, प्रा.शांभवी आजगावकर- मार्गी,प्रा. सौ सुमन करंगळे- सावंत, प्रा. रेश्मा कोचरेकर, प्रा. प्रियंका माळकर, प्रा. पल्लवी हेदुळकर,प्रा. वैजयंती नर, प्रा. पूजा मालंडकर तसेच प्रा. प्रणाली मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले गुणवंत विद्यार्थ्यांचे बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री उमेश गाळवणकर संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ .अमृता गाळवणकर, स्कूल ऑफ नर्सिंग च्या प्राचार्य सौ मीना जोशी उपप्राचार्य कल्पना भंडारी यांनी अभिनंदन केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा