You are currently viewing आरोंदा परेल बसफेरी ५ मे पासून होणार सुरु

आरोंदा परेल बसफेरी ५ मे पासून होणार सुरु

वेंगुर्ला /-

       बऱ्याच कालावधीपासून बंद असलेली आरोंदा परेल ही बसफेरी गुरुवार ५ मे पासून सुरु होणार आहे.आरोंदा शिरोडा वेंगुर्ले परेल अशी ही बसफेरी गुरुवार ५ मे रोजी आरोंदा येथून दुपारी ३ वा., वेंगुर्ले येथून सायंकाळी ४ वा. सुटणार आहे.तर ६ एप्रिल पासून परेल येथून सायंकाळी ४.३० वा. ही बसफेरी सुटणार आहे.तालुक्यातील तसेच विशेषतः मुंबईवरुन येणाऱ्या प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले स्थानकप्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे.जनतेच्या दृष्टीने आवश्यक असलेली ही बसफेरी सुरु होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..