You are currently viewing अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष ठेवल्याप्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता.;अॅड विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष ठेवल्याप्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता.;अॅड विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

ओरोस /-

अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी लैंगिक संबंध ठेवणे व तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणे या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या पंकज प्रकाश पेडणेकर वय वर्षे २५, राहणार तिरोडा, या संशयिताला जिल्हा विशेष न्यायाधीश आर बी रोटे यांनी तीस हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने अॅड विवेक मांडकुलकर तसेच अॅड भुवनेश प्रभुखानोलकर यांनी काम पाहिले. संशयिताने अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी लैंगिक संबंध ठेवले व तिचे अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी दिली अशी तक्रार वेंगुर्ला पोलिस स्थानकात दाखल झाली आहे. त्यानुसार संशयितावर भा. दं. वि. कलम ३७६, ५०४ सह बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १२ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला दिनांक ११ एप्रिल रोजी अटक करून विशेष न्यायालयासमोर हजर केले असता ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांकडून झालेली पुन्हा पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने अमान्य करून संशयितास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान संशयिताने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्यावरील सुनावणी दरम्यान संशयितातर्फे अॅड विवेक मांडकुलकर यांनी काम पाहिले.यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष न्यायालयाने त्याला तीस हजार सशर्त जामीन मंजूर केला आहे.

अभिप्राय द्या..