वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यातील निवती -मेढा गावात तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या ,मालमत्तेची (घराची ) नुकसानभरपाई अद्यपपर्यंत न मिळाल्याने निवती येथील ग्रामपंचायत सरपंच सौ.भारती धुरी यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या सोबत ग्रामपंचायत सदस्य नागेश सारंग ,तृप्ती कांबळी , ग्रामस्थ श्री. घाटवळ उपस्थित आहेत.
१६ मे २०२१ रोजी झालेल्या चक्रीवादळाची नुकसानभरपाई अद्यपपर्यंत निवती मेढा गावातील ग्रामस्थांना मिळाली नाही.या वादळात ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले होते.यासंदर्भात वेंगुर्ला तहसीलदार यांना २५ ऑक्टोम्बर २०२१ रोजी ग्रामस्थांनी नुकसानभरपाई मिळत नाही तर आम्ही १ नोव्हेंबर पासून निवती ग्रामस्थ उपोषण करू असे सांगितले होते.मात्र त्या वेळी वेंगुर्ला तहसीलदार यांनी ग्रामस्थांना सांगितले की जिल्हाधिकारी यांच्यासोबत मीटिंग घेऊन लवकरात-लवकर नुकसान भरपाई देऊ असे सांगितले होते.अजून कोणत्याही प्रकारची हालचाल नसल्याने आणि नुकसानभरपाई मंजूर होऊन जवळपास ११ महिने उलटून गेले तरी कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. म्हणून आज गुरुवारी दिनांक २८/०४/२०२२ रोजी पासून निवती सरपंच ,ग्रामस्थ यांनी साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.जोपर्यंत तौक्ते चक्रीवादळ|मुळे नुकसान झालेल्या ,मालमत्तेची (घराची ) नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत आमचे हे साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे निवती ग्रामपंचायत सरपंच सौ.भारती धुरी यांनी सांगितले.