You are currently viewing आलिशान गाडीने गोवा बनावटी दारू वाहतूक करणारा सोलापूरचा युवक एक्साईजच्या अटकेत.;कारसह ५ लाख ७१ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त..

आलिशान गाडीने गोवा बनावटी दारू वाहतूक करणारा सोलापूरचा युवक एक्साईजच्या अटकेत.;कारसह ५ लाख ७१ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त..

बांदा /-

आलिशान कार मध्ये चोर कप्पे करून गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सोलापूर येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून कारसह ५ लाख ७१ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी बांदा-ओटवणे रस्त्यावर करण्यात आली. बंडू दामु मासाळ (३५), रा. धायटी ता. सांगोला, असे त्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, या कारवाईत संबंधितांकडून १ लाख २१ हजार ९२० रुपयांची दारू व ४ लाख ५० हजार रुपये किंमतीची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क चे सिंधुदुर्ग अधीक्षक डॉ. वी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक एस. पी. मोहिते यांनी केली.

या कारवाईमध्ये परिविक्षाधीन उप अधीक्षक आर. ए. इंगळे, दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, दुय्यम निरीक्षक पी एस रास्कर, सहा दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, तसेच तात्पुरता तपासणी नाका ओटवणे येथील कर्तव्यावर असलेले सातारा येथील दुय्यम निरीक्षक किरण बिरादार, सहा. दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, संतोष निकम यांनी सहभाग घेतला. या गुन्हयांचा अधिक तपास निरीक्षक एस. पी. मोहिते करीत आहेत.

अभिप्राय द्या..