दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या त्वरीत करा अन्यथा जनआंदोलन उभे करू सर्वपक्षीयांचा ईशारा..

ओरोस /-

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधिक्षक यांना आज सोमवारी दिनांक २५ एप्रिल रोजी कुडाळ शहरातील विविध पक्षातील ,सामाजिक संस्था मधील प्रमुक पदाधिकारी यांनी ओरोस येथे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन,कुडाळ पोलिस निरिक्षक व सहाय्यक निरिक्षक यांच्या अनागोंदी कारभारा बाबत लक्ष वेधण्यात आले.कुडाळ शहरात झालेल्या दारू घोटाळ्या संदर्भातील दोषींनवर कारवाई करण्यात यावी असे सांगत पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे कुडाळ तालुका अध्यक्ष अभय शिरसाट ,मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रसाद रेगे ,शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक ,भाजपचे अनिल उर्फ बंड्या सावंत ,व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट उपस्थित होते.

कुडाळ तालुक्यातील बनावटी दारू धंद्यांना अभय देवून,व्यवसाय मोठ्याप्रमाणावर सुरु ठेवा अशा सूचना देऊन दारू व्यवसायकांची मोठी मजल झाली आहे.हल्लीच कुडाळ शहरातील हॉटेल कृष्णा सागर येथे सापडलेली बेवारस दारू जी दिनांक १२/१२/२०२१ ची डायरी नोंद,असताना या बाबत पुढील कोणतीही कारवाई न करता परस्पर वाटून घेतली गेली या गैर कृत्यामध्ये दोन अधिकारी सामिल होते.याची माहीतीच्या अधिकारामध्ये माहीती मागीतली असता सारवा सारव करून पुढील कारवाईची प्रक्रिया केली गेली, म्हणजे रात्रीच्या गस्ती मध्ये असे किती प्रकार होत असतील? या दोन्ही अधिकाऱ्यांनी सामाजीक राजकीय लोकांचा आदर कधी केला नाही जेणेकरून सर्व सामान्य लोकांच्या अडचणी घेवून ते पोलिस ठाण्यात कधी येवू नये व सामान्य लोकांना धाकदपटशाहीने आर्थिक तडजोड करता यावी असा सर्व प्रकार होत आहे.तरी आपण कुडाळ तालुक्यातील या दोन्ही अधिकान्यांच्या बदल्या त्वरीत करण्यात याव्यात अन्यथा जनआंदोलन उभे करावे लागेल असे सर्वपक्षीय यांच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सांगण्यात आले.

कुडाळ तालुका नेहमी शांतताप्रिय शिस्तप्रिय आणि कायदा मानणारा राहीलेला आहे.या कुडाळ मद्धे अनेक सामाजीक संस्था, राजकीय पक्ष कार्यकर्ते आपले काम करतात,कोणत्याही घटनेचा मनात किंतु /परंतु, राग, व्देष मनात कधीच ठेवत नाहीत.सर्वजण गुन्या गोविंदाने प्रशासनास सहकार्य करत असतात. याआधी पर्यंत कुडाळ पोलिस स्टेशनचे काम, कार्य उत्तम होते.परंतु कुडाळ पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगाडे व सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोज पाटील यांनी कुडाळ मध्ये आल्यापासून पुर्णपणे अंदागोंदीचे कारभार चालु केले आहेत हे कोठेतरी थांबले पाहिजे…यामध्ये प्रामुख्याने फिर्याद द्यायला येणाऱ्या लोकांना त्यांचे म्हणने न ऐकता, दमदाटी करणे, आम्ही सांगतो तसाच जयाब द्यावा लागेल, कायदा आम्हाला समजतो, लिहीले त्यावर फक्त सही करायची अशा प्रकारे धाक, दपटशाही ने वागणूक कुडाळ पोलीस यांच्याकडून दिली जाते सार्वजनिक कार्यक्रम व इतर उत्सवावेळी पोलिसांची असहकार्याची भूमिका असते,कोरोना काळात लॉकडावून वेळी जनते सोबत दादागिरी, शिवीगाळ,युवकांना मारहाण केली गेली होती या सर्वांनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page