You are currently viewing कुडाळ येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपन्न झाले रक्तदान शिबिर

कुडाळ येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपन्न झाले रक्तदान शिबिर

कुडाळ /-

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने कुडाळ येथील लक्ष्य क्रिएशन व युवा फोरम भारत संघटना यांच्या वतीने कुडाळ न्यू इंग्लिश स्कूल येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.

कुडाळ येथील लक्ष्य क्रिएशन व युवा फोरम भारत संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून झाले यावेळी लक्ष्य क्रिएशनचे अध्यक्ष विलास कुडाळकर, उपाध्यक्ष प्रवीण जाधव, सचिव रजनीकांत कदम, खजिनदार देवदास जाधव, सदस्य यशवंत कुडाळकर आनंद पेंडुरकर, सिद्धार्थ बावकर, जनार्दन कुडाळकर, अरुण कुडाळकर, प्रथमेश कुडाळकर, सुधीर कुडाळकर, केतन कदम, युवा फोरम भारत संघटनेचे उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव ॲड. हितेश कुडाळकर, जिल्हाध्यक्ष शुभम सिंदगीकर, जिल्हा सचिव केतन शिरोडकर, तालुकाध्यक्ष सौरभ शिरसाट, विवेक राजमाने, अक्षय गंगावणे, प्रितेश कदम आदी उपस्थित होते.

फोटो:- लक्ष्य क्रिएशन व युवा फोरम भारत संघटनेच्यावतीने कुडाळ येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

अभिप्राय द्या..